Monday, November 28, 2022

गर्भसंस्कार - आयुर्वेदाचे एक वरदान !

 

 तुम्हाला माहितीये का ? तुमचे गर्भात असणारे बाळ तुमचे बोलणे ऐकू शकते .जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा ते पण आनंदी असते ,आणि आई दुखी असेल तर ते पण दुखी असते. आईचे हसणे , रडणे , झोपणे , संवाद साधने  अश्या सगळ्याच गोष्टींना बाळ प्रतिक्रिया देत असते.

 प्रत्येक पालकांना असे वाटते कि त्याची होणारी संतती ही बुद्धिमान , दयावान, चारित्र्यसंपन्न ,धैर्यशील व्हावी.अश्या बऱ्याच अपेक्षा पालकांना त्यांच्या होणाऱ्या बाळाकडून असतात.तर गर्भसंस्कार हे त्याच पालकांच्या मदतीसाठी आयुर्वेदाचे एक वरदानच आहे.

                                   

गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय ?

गर्भसंस्कार या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे -

गर्भ म्हणजे स्त्रीच्या गर्भात वाढणारे बाळ आणि संस्कार म्हणजे शिकवणे.

तर गर्भसंस्कार म्हणजे गर्भात वाढणाऱ्या बाळाला गर्भात असतानाच काही गोष्टी शिकवणे.तसेच गर्भसंस्कारांच्या मदतीने आई आणि बाळाचे नाते घट्ट होण्यास गर्भातूनच सुरुवात होते बाळाची शारीरिक मानसिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते.

गर्भसंस्कार हे आयुर्वेदाचे एक असे वरदान आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बालकास गर्भात असताना पासूनच योग्य ते संस्कार देण्यास मदत होते.

अनेक शोधनिबंधातून असे निदर्शनास आले आहे कि बाळाचा मेंदू हा गर्भावस्थेत अधिक ग्रहणशील असतो.

त्यामुळेच तुम्ही तुमच्या बाळासोबत गर्भावस्थेतच विविध प्रकारे तुमच्या बालकाच्या भावनिक , सर्जनशील ,सामाजिक ,बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यासाठी बालकास मदत करू शकता.

 

गर्भसंस्काराद्वारे नक्की काय केले जाते ?

👉गर्भसंस्कारांच्या मदतीने तुम्ही तुमचे बलक गर्भात असताना पासूनच तुम्ही त्याच्याशी तुमचे नाते घट्ट करू शकता.

👉गर्भसंस्कारा मध्ये गर्भवती स्त्रीला तिच्या तिच्या गर्भातील बाळासाठी पोषक असा आहार महिन्यानुसार दिला जातो .

👉गर्भवतीचे संपूर्ण गर्भारपण संपेपर्यंत निरोगी आणि सुखरूप राहावी यासाठी प्रयत्न केले जातात.

👉गर्भवती स्त्रीसाठी तिच्या गर्भारपणाच्या महिन्यानुसार योगा ध्यान यांचा सल्ला दिला जातो तिला योगा शिकवला जातो.

👉संपूर्ण गर्भावस्था दरम्यान तिच्या शरीरानुसार गरज असेल तर तिच्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल केले जातात आणि गर्भावस्थेदरम्यान पाळावयाची जीवनशैली बद्दल तिला मार्गदर्शन केले जाते.

👉गर्भावस्थे दरम्यान संगीत थेरपी सांगितली जाते.

👉बालकाच्या मेंदू च्या विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात.

👉गर्भावस्थेत गर्भात असणाऱ्या बालकाशी कसा संवाद साधायचा हे शिकवले जाते.यालाच गर्भसंवाद असे म्हणतात.

👉गर्भसंसकाराद्वारे तुमच्या बालकाचे चांगले व्यक्तिमत्व घडवून आणण्यास योग्य मार्गदर्शन केले जाते.

👉गर्भसंस्काराद्वारे संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान गर्भवतीचे सकारात्मक विचार , सकारात्मक दृष्टिकोन बालकाचा शारीरिक मानसिक विकास होण्यासाठी काही उपक्रम राबवले जातात.

👉होणाऱ्या आईची प्रसूती साठी मानसिक शारीरिक तयारी करू घेतली जाते.

 

गर्भसंस्कारांची सुरुवात कधी करावी ?

   👉जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही  कोणत्याही महिन्यात (शक्य तितक्या लवकर ) गर्भसंस्कार करू शकता.

   👉  जर तुम्ही संतती साठी प्रयत्न करणार असाल तर त्यापूर्वी तीन महिने आधीपासून गर्भसंस्कार करावेत.यात बीजसंस्कार , गर्भधारणेपूर्वी पंचकर्म चिकित्सा , गर्भधारणेपूर्वी योगा मार्गदर्शन ,होणाऱ्या पालकांची मानसिक तयारी इतर काही उपक्रम अश्या प्रकारे गर्भसंस्कार करतात.

      आजकाल लोक गर्भ राहिला हे माहिती झाले कि गर्भसंस्कार करण्यास येतातपरंतु जर तुम्ही गर्भवती होण्याआधीपासून गर्भसंस्कारांची सुरुवात केली तर त्याचे अजून अधिक फायदे तुम्हाला मिळू शकतात.

    

गर्भसंस्कार उपक्रमांना ऑनलाईन सामील होण्यासाठी / गर्भसंस्कारा बद्दल अधिक माहिती मार्गदर्शनासाठी संपर्क - 

Whatsapp – 7769938803

Email id - hercare2021@gmail.com

 

 

डॉ.मयुरी पटवारी

एम.एस.( स्त्रीरोग & प्रसूतीतज्ज्ञ )

गर्भसंस्कार , प्रसूती पूर्व - पश्चात योगा मार्गदर्शक.

Monday, November 14, 2022

सुवर्णप्राशन - एक आयुर्वेदिक संस्कार !

 

सुवर्णप्राशन - एक आयुर्वेदिक संस्कार !

 आयुर्वेद नुसार मानवी आयुष्यातील १६ संस्कार वर्णन केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे

सुवर्णप्राशन संस्कार.


  ✅सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय ?

   सुवर्णप्राशन हा एक आयुर्वेदिक षोडश संस्कारारांपैकी एक आहे.यामध्ये मध ,सुवर्ण भस्म , घृत आणि काही मेध्य आयुर्वेदिक औषधींचा वापर करून सुवर्णप्राशन योग बनवला जातो दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी तो बालकांना दिला जातो.                     

                 

आयुर्वेदात सुवर्णप्राशनाचे आलेले वर्णन -

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्नि बल वर्धनम्

आयुष्यंमंगलं पुण्यं वृष्यं ग्रहापहम्

मासात् परम मेधावी व्याधिभिर्न दृश्यते 

षड्भिमासै: श्रुतधर सुवर्ण प्राशनात् भवेत् (काश्यप संहिता, सूत्रस्थानम्)

 

आचार्य काश्यपांनी बालकांसाठी सुवर्णप्राशन संस्कार वर्णन केला आहे.त्याचे बालकासाठी होणारे फायदे आचार्य काश्यपानी खालील प्रकारे वर्णन केले आहेत -

- मेधा वर्धन ,अग्नी वर्धन , बल वर्धन ,आयुष्य वर्धन , पुण्यकारक ,कल्याणकारक ,  वृष्य , वर्ण्य  ,ग्रहपीडा नाशक आहे.  सुवर्णप्राशनाच्या सेवनाने बालक मेधावी बनतो आणि त्याचे विविध रोगांपासून संरक्षण होते. तो श्रुतधर (ऐकलेले लक्षात ठेवणारा) होतो त्याची स्मरणशक्ती वाढते.

 

सुवर्णप्राशन कोणाला द्यावे  ?

- १६ वर्षापर्यंतच्या बालकास सुवर्णप्राशन दिले जाते.

 

बालकास सुवर्णप्राशन देणे कधी सुरु करावे ?

शक्य असेल तितक्या लवकर बालकास सुवाराप्राशन देणे सुरु करावे.

 

कधी द्यावे ?

महिन्यापर्यंतच्या बालकास सुवर्णप्राशन दररोज दिले जाऊ शकते , जर दररोज शक्य नसेल तर

 दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आवर्जून द्यावे.

महिन्यानंतर ते १६ वर्षापर्यंत बालकास दर पुष्य नक्षत्रास सुवर्णप्राशन द्यावे.

 

पुष्य नक्षत्रासच सुवर्णप्राशन का द्यावे ?

पुष्य म्हणजे पोषण.

पुष्य नक्षत्रास सुवर्ण आणि इतर औषधींचा एक विशिष्ट प्रभाव असतो  त्यांचे पोषण करण्याचे 

सामर्थ्य अधिक पटींनी वाढलेले असते.

पुष्य नक्षत्रामुळे काम करण्याची क्षमता & बुद्धी वाढते.

सकाळी लवकर का द्यावे ?

सकाळी जठराग्नी खूप असतो., तेव्हा त्यावेळी सुवर्ण प्राशन दिल्याने जास्त फायदे दिसून येतात.या काळात सुवाराप्राशन दिल्यास ते लवकर पचते.

 

✅सुवर्णप्राशन सेवनाचे फायदे -

- रोगप्रतिकार शक्ती वाढते.

- रोगांपासून संरक्षण मिळते.

- त्वचेचा वर्ण सुधारतो आणि त्वचा रोग दूर राहतात .

- बालकांची स्मृती ,धी, बुद्धी ,मेधा वाढते.

- बालकांची दृष्टी सुधारते.

- बालकांचे सार्वदेहिक शुक्र वाढते.

- पाचकाग्नि वाढून पचनशक्ती सुधारते बालकाचे व्यवस्थित पोषण होऊ बालक पुष्ट होतो.

- बालकाचा शारीरिक मानसिक विकास होतो.

                                                                          

तुमच्या बालकासाठी सुवर्णप्राशन मागविण्यासाठी  संपर्क – hercare2021@gmail.com



Sunday, November 6, 2022

USES OF KUSHMANDA IN GYNAECOLOGY

it is known as kushmand in Marathi ,petha in Hindi , Kushmanda in Sanskrit & Ash gourd / winter melon in English.

Latin Name - Benincasa hispida

Family - Cucurbitaceae

Properties -

Rasa - Madhur

Virya - Sheeta

Vipaka - Madhur

Guna - Guru , ruksha

Prabhav - Medhya

USES -

  1. Shukravruddhikar ( increases sperm count )

  2. Shukradaurbalya ( helpful in abnormalities in sperms)

  3. Vrushya ( aphrodiasic)


Wednesday, November 2, 2022

START YOUR BLISSFUL JOURNEY OF PREGNANCY WITH OUR GARBHSANSKAR SESSIONS !

 

   Hello moms to be !!🤰🏼

  We are here to help you for making your pregnancy blissful and healthy 🤰🏼

🤰🏼You can start your Garbhasanskar sessions online with us.

🤰🏼NO Need to visit clinic.

🎊* Specialities - *🎊

* Garbhasanskar
* Diet during pregnancy 
* yoga during pregnancy 
* Garbhsamvad ( talking to your unborn baby)
* Meditation during pregnancy 
* IQ stimulation activities for baby
* Music therapy during pregnancy 
* Online sessions 
* On Saturday / Sunday evenings 

🤰🏼Time - 5pm - 6pm (India)( may change as per other batches)

🤰🏼DM to register and start your Happy & Healthy Pregnancy Journey with us !!"

Wishing You a Happy ,Healthy & Blissful Pregnancy !!😊


- Dr.Mayuri S.Patwari 
  M.S.(OBGY-Ayu)
  Garbhasanskar.,
  Pre & Post Natal yoga consultant 
  DM TO START YOUR JOURNEY WITH US..

Healing the Womb Naturally: Uttarbasti for Infertility !

            Infertility is an increasingly common concern, affecting millions of women around the world. While modern medical treatments lik...