आजकाल सगळीकडे कोरोनाचा रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वानी कोरोना होऊन गेल्यानंतर देखील शरीराची योग्य काळजी घेतली असता पुढील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. एकदा कोरोना होऊन गेला तरी तो पुन्हा उदभवू शकतो हे सर्व रुग्णांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. व त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे
कोरोना झाल्यानंतर तुम्ही बरीचशी औषधे घेऊन बरे होता तरीही नंतर हि औषधे घेणे का गरजेचे आहे ?
कोरोना पूर्वी - प्राकृत फुफ्फुस 👇
कोरोना झाल्यानंतर तुमच्या मुख्यतः फुफ्फुसांची विकृती निर्माण होते कोरोना झाल्यानंतर फुफुसांना मिळणारा रक्त पुरवठा कमी होऊ लागतो आणि त्यामुळेच फुफ्फुसांना सूज आलेली असते व फुफ्फुसांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असते तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्तीही कमी झालेली असते आणि त्यामुळेच अनेक लक्षणे दिसून येतात.
कोरोना झाल्यानंतर फुफ्फुसे 👇
कोरोना होऊन गेल्यानंतर देखील हि फुफ्फुसांची विकृती बरी होण्यास अधिक वेळ लागतो त्यामुळेच कोरोना मधून बरे होऊन आल्यानंतर देखील रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.
👉थकवा
👉 श्वास घेण्यास त्रास होणे.
👉 खोकला
👉 छातीत दुखणे
👉 सांधे दुखणे.
👉 डोकेदुखी
👉 अंगदुखी
👉 चव न लागणे
👉वास न येणे.
👉झोप न लागणे.
👉 सतत चिंता , भीती वाटणे .
👉 धडधड होणे.
👉 बैचेनी वाटणे .
👉 नैराश्य
👉थोडेही काम केल्यानंतर अधिक थकवा जाणवणे.
👉 तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुकत्याच प्रकाशित माहितीनुसार स्टिरॉइड्स च्या अतिवापराने विविध बुरशी जन्य आजार दिसून येत आहेत.
कोरोना होऊन गेल्यानंतर कमीत कमी ३ महिने रुग्णाची काळजी घेणे गरजेचे असते. ३ महिन्यापर्यंत वरील लक्षणे दिसून येऊ शकतात.रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असल्याने इतरही काही लक्षणे दिसून येऊ शकतात.लक्षणे दिसून येऊ लागली असता रुग्णाने घाबरून जाऊ नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणांची तीव्रता वाढेपर्यंत अंगावर काढू नये.
आयुर्वेदिक औषधे का घ्यावीत ?
आयुर्वेद हा मुळापासून रोग नष्ट करतो हे सर्वाना माहिती आहेच.आयुर्वेदानुसार ,कोरोना मध्ये मुख्यतः प्राणवह स्रोतस दुष्टी दिसून येते.त्यामुळे तुम्हाला कोरोना होऊन गेल्यानंतर जर तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही आयुर्वेद औषधी घेतली तर कोरोनामुळे झालेली शरीराची हानी लवकर भरून येण्यास मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील लवकर वाढून कोरोनानंतर होणारे आजारांची शक्यता कमी करण्यास मदत होते.व तुम्हाला तुमचे निरोगी व सशक्त शरीर लवकर मिळवण्यास मदत होते.
मुख्यतः.कोरोना नंतर वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषधांमधील घटक द्रव्ये -
तुलसी , वासा , यष्टिमधु , मंजिष्ठा , अश्वगंधा , गुडूची , शतावरी , सुंठी ,एरंडमूळ , अभ्रकभस्म, लोहभस्म , दुर्वा , दालचिनी , जटामांसी , नागवेल ,पिप्पली ,लसुन , भुई रिंगणी , पारिजातक , कर्कटशृंगी , निर्गुण्डी पत्र, भृंगराज,इ.
हि द्रव्ये काय कार्य करतात ?
👉फुफ्फुस व हृदयाला बल देऊन त्यांच्या अंत-त्वचेतील सूज कमी करण्यास मदत करून विकृती वाढ कमी करण्यास मदत करतात.त्यामुळे फुफ्फुसांची विकृती कमी करण्यास मदत होते.
👉 मांसपेशींना आवश्यक बल आणि प्राणवायू पुरवठा करून अंगदुखी , व इतर शरीर वेदना कमी करण्यास मदत करतात.
👉शरीरातील विषाणू तापामुळे आतड्यात तयार झालेले विषारी दोष बाहेर काढून उत्तम पोषक रसाची निर्मिती करतात.आणि त्यामुळेच आतून जाणवणारा थकवा , अनुत्साह , दुर्बलता , निस्तेजता दूर करतात.
👉विषाणू तापामुळे झालेली यकृतातील दोषदुष्टी नष्ट करून सकस रक्ताची निर्मिती करण्यास मदत करतात आणि त्यामुळेच रक्ताच्या गुठळ्या , रक्ताल्पता , त्वचारोग , इ दूर करतात.
👉कोरोना नंतर वृक्क - हृद्य या अवयवात निर्माण झालेले दोष दूर करून , त्यांची सूज कमी करण्यास मदत करतात व रक्त आणि मूत्रातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.
👉 यातील काही रसायन द्रव्ये विषाणू तापानंतरची आढळून येणारी निद्रानाश , मानसिक थकवा ,नैराश्य ,विस्मरण , चव न लागणे, वास न येणे , इ. लक्षणे दूर करतात.
👉 शरीरातील दोष दुष्टी दूर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरतात.
👉तसेच यांपैकी रसायन द्रव्ये हि शरीराची रोग प्रतिकार शक्ती लवकर वाढवून शरीराचा झालेला क्षय दूर करतात.
Helpful information 👍
ReplyDeleteVery nice blog..
Informative👍
ReplyDeleteinformative blog
ReplyDelete