सुवर्णप्राशन - एक आयुर्वेदिक संस्कार !
आयुर्वेद नुसार मानवी
आयुष्यातील १६ संस्कार
वर्णन केले आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे
सुवर्णप्राशन
संस्कार.
✅सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय ?
सुवर्णप्राशन हा एक आयुर्वेदिक षोडश संस्कारारांपैकी एक आहे.यामध्ये मध ,सुवर्ण भस्म , घृत आणि काही मेध्य आयुर्वेदिक औषधींचा वापर करून सुवर्णप्राशन योग बनवला जातो व दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी तो बालकांना दिला जातो.
आयुर्वेदात सुवर्णप्राशनाचे आलेले वर्णन
-
सुवर्णप्राशनं
हि एतत् मेधाग्नि
बल वर्धनम् ।
आयुष्यंमंगलं
पुण्यं वृष्यं ग्रहापहम्
॥
मासात् परम मेधावी
व्याधिभिर्न च दृश्यते ।
षड्भिमासै: श्रुतधर सुवर्ण प्राशनात्
भवेत् ॥ (काश्यप
संहिता, सूत्रस्थानम्)
आचार्य काश्यपांनी बालकांसाठी सुवर्णप्राशन
संस्कार वर्णन केला
आहे.त्याचे बालकासाठी
होणारे फायदे आचार्य
काश्यपानी खालील प्रकारे
वर्णन केले आहेत
-
- मेधा वर्धन ,अग्नी
वर्धन , बल वर्धन
,आयुष्य वर्धन , पुण्यकारक
,कल्याणकारक , वृष्य
, वर्ण्य ,ग्रहपीडा
नाशक आहे. सुवर्णप्राशनाच्या
सेवनाने बालक मेधावी
बनतो आणि त्याचे
विविध रोगांपासून संरक्षण
होते. तो श्रुतधर
(ऐकलेले लक्षात ठेवणारा)
होतो व त्याची
स्मरणशक्ती वाढते.
✅सुवर्णप्राशन
कोणाला द्यावे ?
० - १६ वर्षापर्यंतच्या
बालकास सुवर्णप्राशन दिले
जाते.
बालकास सुवर्णप्राशन देणे कधी
सुरु करावे ?
शक्य असेल तितक्या
लवकर बालकास सुवाराप्राशन
देणे सुरु करावे.
✅कधी द्यावे ?
६ महिन्यापर्यंतच्या बालकास सुवर्णप्राशन
दररोज दिले जाऊ
शकते , जर दररोज
शक्य नसेल तर
दर महिन्याच्या
पुष्य नक्षत्राच्या दिवशी
आवर्जून द्यावे.
६ महिन्यानंतर ते १६ वर्षापर्यंत बालकास दर
पुष्य नक्षत्रास सुवर्णप्राशन
द्यावे.
✅पुष्य नक्षत्रासच सुवर्णप्राशन का
द्यावे ?
पुष्य म्हणजे पोषण.
पुष्य नक्षत्रास सुवर्ण आणि इतर औषधींचा एक विशिष्ट प्रभाव असतो व त्यांचे पोषण करण्याचे
सामर्थ्य अधिक पटींनी वाढलेले असते.
पुष्य नक्षत्रामुळे काम करण्याची क्षमता & बुद्धी वाढते.
सकाळी लवकर का द्यावे ?
सकाळी जठराग्नी खूप असतो., तेव्हा त्यावेळी सुवर्ण प्राशन दिल्याने जास्त फायदे दिसून येतात.या काळात सुवाराप्राशन दिल्यास ते लवकर पचते.
✅सुवर्णप्राशन
सेवनाचे फायदे -
- रोगप्रतिकार
शक्ती वाढते.
- रोगांपासून
संरक्षण मिळते.
- त्वचेचा वर्ण सुधारतो
आणि त्वचा रोग
दूर राहतात .
- बालकांची स्मृती ,धी, बुद्धी
,मेधा वाढते.
- बालकांची दृष्टी सुधारते.
- बालकांचे सार्वदेहिक शुक्र वाढते.
- पाचकाग्नि वाढून पचनशक्ती
सुधारते व बालकाचे
व्यवस्थित पोषण होऊ
बालक पुष्ट होतो.
- बालकाचा शारीरिक व मानसिक
विकास होतो.
तुमच्या बालकासाठी सुवर्णप्राशन मागविण्यासाठी संपर्क – hercare2021@gmail.com