Friday, May 14, 2021

"Isolation" करताय ? मग एकदा वाचाच !

    आजकाल सर्वानाच माहिती आहे कि COVID-19 रुग्णाने / संशयिताने Isolation करावे , पण Isolation करावे म्हणजे नक्की काय ? सर्वाना फक्त एवढी माहिती आहे कि रूग्ण / संशयिताला वेगळ्या खोलीत ठेवावे.पण त्यादरम्यान नक्की काय काय काळजी घ्यावी ? कारण जर योग्य काळजी घेतली नाही तर त्या Isolation चा मूळ हेतू म्हणजे रूग्ण / संशयित यांपासून इतरांना होणारा प्रसार रोखणे हा साध्य होऊ शकत नाही. त्यामुळेच ..

                                                

    


Isolation कोणी कोणी करावे ?

👉जे लोक COVID -19 चे रुग्ण आहेत.

👉 जे लोक COVID -19 च्या रुग्णाच्या संपर्कात आले आहेत.

👉ज्यांच्या घरी  COVID -19 चे रुग्ण आढळून आले आहेत.

👉 ज्या लोकांना  COVID -१९ च्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे आढळून आली आहेत.( सर्दी , खोकला, ताप येणे ) अशी लक्षणे दिसून आली असता ज्या व्यक्तीला ही लक्षणांपैकी कोणतेही लक्षण असेल त्याने लगेचच Isolation करावे.(संशयित रुग्ण).

👉जे संशयित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी सुद्धा Isolation केले तर पुढील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

Isolation कसे करावे आणि काय काय काळजी घ्यावी ?

👉 रुग्णास / संशयितास स्वतंत्र खोली असावी.

👉 Isolation मध्ये असणाऱ्या व्यक्तीला जेवायला देताना शक्यतो कागदी प्लेट्स व ग्लास असे वापरावेत.

👉 जर ते शक्य नसेल तर रुग्णाचे / संशयिताचे वापरलेले भांडी वेगळी ठेवावीत.

👉 रुग्णास / संशयितास वापरावयास स्वतंत्र बाथरूम & टॉयलेट असावे . ते शक्यच नसेल तर रुग्णाने वापरल्यानंतर  dettol / sodium Hypochloride ने तिथे फवारा मारूनच ते वॉशरूम वापरावे.

👉 रुग्णाचे / संशयिताचे कपडे देखील वेगळीकडे ठेवावेत.

👉 रुग्णास अन्न, पाणी वैगेरे गरजेच्या वस्तू चा पुरवठा करायचा असेल तर ते सर्व सामान Isolation खोलीच्या बाहेर च ठेवून द्यावे. त्या खोलीतून कुठलीही वस्तू बाहेर आणू नये. फारच गरजेची वस्तू असेल तर ती sanitize स्प्रे करूनच घ्यावे.

👉 घरात Isolated रूग्ण / संशयित असतील तर घरात वावरताना सर्वानी मास्क चा वापर करावा.

👉 घरात Isolated रूग्ण / संशयित असतील तर घरातील सर्वानी विशेष काळजी घ्यावी व सतत साबण / हँडवॉश ने हात धुवावे.

Isolation किती दिवस करावे ? 

👉रूग्ण / संशयिताने कमीत कमी १४ दिवस विलगीकरणात राहावे .

👉 संशयिताने १४ दिवस विलगीकरण पाळण्याचे कारण कि जर काही दिवसानंतर संशयित हा Covid ने पॉजिटीव्ह आला ( कधी कधी सुरुवातीला रिपोर्ट नेगेटिव्ह येतो आणि काही दिवसानंतर तोच व्यक्ती पॉजिटीव्ह होता हे कळते.)तर  अश्या वेळी संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.


2 comments:

Healing the Womb Naturally: Uttarbasti for Infertility !

            Infertility is an increasingly common concern, affecting millions of women around the world. While modern medical treatments lik...