Friday, April 30, 2021

आयुर्वेदानुसार , कोरोना आणि " STEAMING " यांचा संबंध !


आजकाल कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी घराघरात STEAMING चा वापर केला जातोय.सगळ्यांनाच माहिती आहे कि सकाळ संध्याकाळ वाफ घेतली तर आपण सुरक्षित राहू. पण असे का ? कोरोना आणि वाफ घेणे यांचा कसा संबंध आहे ?

                              

 "STEAMING" यालाच आयुर्वेदात स्वेदन म्हंटले आहे.आचार्य चरक स्वेदनाची प्रशस्ती वर्णन करताना म्हणतात - 

"स्वेदनाचा उपयोग हा  वात कफ विकारांसाठी होतो. कारण वात आणि कफ हे दोन्ही दोष शीत गुणाचे आहेत."

आयुर्वेदानुसार , कोरोना हा वातकफज ज्वराशी साधर्म्य राखतो आणि ज्वर चिकित्सा वर्णन करताना चरकांनी  ज्वर मध्ये स्वेदन चिकित्सा देखील वर्णन केली आहे.

यावरून असे दिसून येते कि कोरोना हा वातकफज ज्वरापासून संरक्षण करण्याकरिता वाफ घेतली असता तेथे वात आणि आणि कफाचे शमन होते आणि तो कफ द्रवित होऊन कमी होतो.

वैज्ञानिकांच्या नुकत्याच लखनौ येथे झालेल्या शोधानुसार , दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घेतली तर कोरोना पासून बचाव तर होतोच तसेच कोरोना रुग्ण देखील लवकर  बरे होऊ शकतात.वाफ श्वास नलिकेमधील रक्ताचा संचार वाढवते आणि रोग प्रतिकार क्षमता मजबूत करते.तसेच या शोधात हे देखील आढळून आले आहे कि ५० डिग्री सेल्सिअस वर कोरोना विषाणू कमजोर होतो तर ६० डिग्री सेल्सिअस वर तो एवढा कमजोर होतो कि शरीराची रोग प्रतिकारशक्ती त्याला मात देऊ शकते.                                

वाफ घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे ?

१. वाफ घेताना  फॅन खाली बसून , कूलर समोर बसून वाफ घेऊ नये.

२. वाफ घेऊन लगेचच थंड हवेत जाऊ नये.

३. वाफ घेऊन लगेच थंड पाणी पिऊ नये

४.वाफ घेताना वाफेपासून डोळ्यांना जपावे.

५.वाफ व्यवस्थित प्रकारे नाकाने घेतली जाईल अशी शरीराची स्थिती ठेवावी आणि डोळ्यांचे वाफेपासून संरक्षण करावे..

६.वाफ घेताना पाण्यात पुदिना / ओवा टाकून वाफ घ्यावी.

4 comments:

  1. Helpful n useful information 👍🙏

    ReplyDelete
  2. ^_^ thank you so much for this article,very informative and useful along with do's and don'ts

    ReplyDelete

Healing the Womb Naturally: Uttarbasti for Infertility !

            Infertility is an increasingly common concern, affecting millions of women around the world. While modern medical treatments lik...