आजकाल बयाच मुली , स्त्रिया यांच्याकडून "मला पण PCOS / PCOD आहे असे वाक्य अगदी सर्रास आणि सहजतेने उच्चरलेले ऐकायला मिळते.तर नक्की PCOS / PCOD म्हणजे काय ? यामध्ये कोणती लक्षणे दिसून येतात ?
PCOS / PCOD हा आजकाल आढळून येणारा एक स्त्रियांचा प्रजनन संस्थेशी संबंधित आजार आहे.
PCOS / PCOD - Poly Cystic Ovarian Syndrome / Disease
शाळेत- कॉलेज ला जाण्याऱ्या मुली याना -
- अनियमित पाळी
- पाळी दरम्यान पूर्वीपेक्षा अधिक त्रास होणे .
- अचानक वजन वाढणे.
- चेहऱ्यावर केस येणे .
- चेहऱ्यावर पिंपल्स येणे .
- केस गळणे.
- थकवा येणे .
- नेहमी चिंता करणे .
- अंडाशयावर छोट्या छोट्या ग्रंथी निर्माण होणे .
- मानसिक थकवा अशी बरीच लक्षणे दिसून येतात.
बऱ्याच मुलींना / स्त्रियांना अशी लक्षणे दिसून येतात, सुरुवातीला हि लक्षणे सौम्य असतात परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर त्यामुळे ती गंभीर स्वरूपाची होऊ शकतात. त्यामुळं स्त्रियांना गर्भ लवकर न राहणे , वंध्यत्व यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.म्हणूनच प्रजनन संस्थेच्या स्वास्थ्याची देखील काळजी घेणे हे तितकेच महत्वाचे आहे.
No comments:
Post a Comment