Wednesday, April 21, 2021

कोरोना आणि भय !!


(फोनवरील संभाषण )

व्यक्ती १ - काय अरे कसा आहेस ? काय म्हणतोय कोरोना ?

व्यक्ती २ - काही नाही रे . ठीक आहे. तू कसा आहेस आणि घरी सगळे कसे आहेत ? आणि  तिकडे कसे आहे                        कोरोना  ?  इकडे रुग्ण खूप  वाढलेत  रे ..

व्यक्ती १ - अरे रुग्ण तर सगळीकडेच वाढलेत, तुला सांगू का काल काय झाले आपल्या कॉलनी मध्ये - अरे ते आपल्या शेजारचे Mr .XXXX आहेत ना , ते काल  टेस्ट ला Positive आले होते आणि आता हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत.असं ऐकलंय कि त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे .

व्यक्ती २ - बापरे ! अरे इकडे पण आमच्या सोबत काम करणारे सिनियर परवाच वारले.भयानक झालाय सगळं. 

व्यक्ती १ - भीती वाटायला लागलीय.. कोणी साधा खोकला / शिंकाला तरी ..

आज काल असे संभाषण सगळीकडेच ऐकायला मिळतात .

TV चालू केला कि सगळीकडे कोरोना ! या शहरात रुग्ण संख्या इतकी वाढली / या शहरात इतके रुग्णांचा मृत्यू !

whatsapp वरती अनेक ग्रुप्स वरती कोरोना कोणाला झाला ? त्याला काय झालं ? अश्या प्रकारचे संभाषण !

अनेक Whatsapp ग्रुप्स वरती येणारे कोरोना बद्दल चे messesges तुमच्या नकळत रुग्ण वाचत आहेत , जसे कि ग्रुप मध्ये असणारे किती लोक त्या वेळी हॉस्पिटल मध्ये असतील याची तुम्हाला कल्पना देखील नसते आणि  त्यांच्यासाठी ते अजून भीती वाढण्याचे कारण ठरू शकते आणि बरयाचदा तसे घडते पण.
 
 बरेच लोक रुग्णांना फोन करून बोलतात परंतु त्यांना सहानुभूती देण्याचे सोडून ,  त्यांच्या बोलण्यात कोरोना मुळे हा पण गेला , हा व्हेंटिलेटर वर आहे , हा पण सिरीयस आहे अश्याप्रकारचे बोलणे असते आणि तेच रुग्णाचे रोगाबद्दल चे भय वाढवण्यास कारणीभूत असते.त्यामुळे  कोरोना च नाही तर कोणताही आजार असो रुग्णाला बोलताना त्याला सकारात्मक वाटेल असेच संभाषण ठेवावे . हे लक्षात घ्यावे कि रुग्ण मनानी जर स्थिर आणि धैर्यवान बनला तर तो लवकर बरा होऊ शकतो.        

हे सगळं ऐकून रुग्ण / लोक अजूनच भितात आणि चिंता करायला लागतात.

लोकांच्या बोलण्यात कोरोना , विचारात कोरोना , मनात कोरोना, कोरोना ने सगळंच व्यापलंय आणि तेच कोरोना  बद्दल भीती आणि कोरोना ची परिस्थिती वाढण्यास कारणीभूत ठरतंय.

आयुर्वेदिक आचार्य चरक - यांनी याच परिस्थितीचे वर्णन चरक संहिता मध्ये केले आहे -

" विषादो रोगवर्धनानाम " !! 

विषाद म्हणजे दुःख / चिंता / भीती .
रोग वर्धनानाम म्हणजे रोगाची वाढ होण्यास कारणीभूत प्रमुख घटक .

म्हणजेच रोगाची भीती आणि त्याबद्दलचा सतत विचार/ चिंता , त्याबद्दल केलेले दुःख हेच रोग वाढवण्यात मुख्य घटक आहेत.

 जसे आपण बऱ्याचदा ऐकले आहे कि काही वेळा साप चावल्यावर लोक मरतात  आणि नंतर कळते कि साप विषारी नव्हता. म्हणजेच तो व्यक्ती फक्त साप चावलाय या भीतीनेच मरतो. यावरून च विचार / रोगाची भीती काय करू शकतात याची कल्पना येते.

आज अशी वेळ आहे कि प्रत्येक व्यक्ती च्या ओळखीचे कोणी ना कोणी तरी कोरोना मुळे हॉस्पिटल मध्ये  ऍडमिट आहे , आणि त्यावेळी असे सगळे ऐकून ती व्यक्ती कळत नकळत ही सगळं त्या रुग्णाबद्दल विचार करू लागते
आणि स्वतः सुद्धा सतत चिंतीत राहते.
कोरोना ची परिस्थीती जरी चिंतीत करणारी  असली तरी पण जर सगळ्यांनी तोच तोच विचार करून त्याबद्दलची भीती वाढवून घेऊ नये .

म्हणूनच कोरोना बद्दल सतत बोलणे टाळा ! अनेक कोरोना चे रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत त्यामुळे भीती कमी करून त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने विचार करा . ही परिस्थिती जरी चिंता निर्माण करणारी  असली तरी त्याला धैर्याने सामोरे जाणे हेच यावरील मुख्य औषध म्हणता येईल..!

मास्क वापरा ! सामाजिक आंतर पाळा !!लस घ्या !!सुरक्षित राहा !!!




11 comments:

Healing the Womb Naturally: Uttarbasti for Infertility !

            Infertility is an increasingly common concern, affecting millions of women around the world. While modern medical treatments lik...