आजकाल कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे व बरेच रुग्ण काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल संभ्रमात असतात असे दिसून येते.
रुग्णाचा आहार हा रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत करत असतो म्हणूनच रुग्णाने जर योग्य आहार घेतला तर तो लवकर बरा होण्यास मदतच होते ,म्हणूच रुग्णांसाठी मार्गदर्शन ...
रुग्णांनी काय खायला हवे ?
१. मूग डाळ सूप
२. मूग डाळ भाजी किंवा वरण चपाती किंवा ज्वारी रोटी
3. मुंग डाळ हिंग, मिरे अशा मसाल्यांसह
4. भाज्या
a) भिंडी
b) कोबी
c) फुलकोबी
d) दोडका
e) लसूण वापरुन बनविलेले अन्न
f) आले वापरून बनविलेले अन्न
5. लिंबाचा आहारात वापर करा
6. कोमट पाण्याचा वापर करा
7. मसाले थोड्या प्रमाणात - हिंग,सुंठ ,दालचिनी मिरे (काळी मिरी - दररोज 3-4 पेक्षा जास्त न वापरता)
रुग्णांनी काय खाणे टाळावे ?
1. फळे -
a) केळी
b) द्राक्षे
c) चिकू
d) सीताफळ
2.भाज्या
a)पालक
b)मेथी
3. दही
4. मांसाहार
5. मासे
6.अंडी
7. लोणचे
8.इडली, डोसा, ढोकळा इ. किण्वित केलेले अन्न
9. ब्रेड
10.बेकारीचे पदार्थ
11.तेलकट अन्न
बऱ्याच COVID CARE सेंटर मध्ये मांसाहार दिला जातो परंतु त्याचा हेतू शरीराला बल मिळावे असा आहे पण ते देत असताना रुग्णाच्या अग्नी चा पण विचार करणे आवश्यक आहे . COVID रुग्णामध्ये ज्वर असल्यामुळे अग्निमांद्य असते व अश्या अवस्थेमध्ये मांसाहार केला असता तो पचवणे शरीराला जड जाते व त्यामुळे पंचसंस्थेसंबंधित विकार होऊ शकतात.त्यामुळे शरीराला बल मिळवण्यासाठी सुका मेवा जास्ती प्रमाणात वापरला जाऊ शकतो आणि नवीन आजार टाळता येऊ शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काय खाऊ शकतात ?
1.नारळ पाणी
2.डाळिंब
(छाती मधील कफाचे प्रमाण व खोकला कमी असेल तर खाऊ शकतात. )
Helpful information 👍🙏
ReplyDeleteThanks
Delete👍👍
DeleteThis comment has been removed by the author.
Delete