Saturday, May 1, 2021

कोरोना पासून संरक्षणासाठी च्यवनप्राश खायला का सांगितले जात आहे ?


आजकाल सगळ्यांनाच कोरोना पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी च्यवनप्राश खावे हे माहिती आहे , परंतु च्यवनप्राश तुम्हाला कोरोना होण्यापासून कसे वाचवतो ? हे तुम्हाला माहिती आहे का ??                              

आयुर्वेदानुसार , च्यवनप्राश हे चरक आचार्यांनी रसायन म्हणून वर्णन केले आहे.

तर रसायन म्हणजे काय ? आणि त्याचे फायदे काय ?

रसायन -

जे औषधी द्रव्य स्वस्थ मनुष्याच्या शरीरात उर्जस्कर सिद्ध होऊन बलवर्धन करते आणि त्याला दीर्घ जीवन प्रदान करून देते ते रसायन होय.

रोग निर्माण झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी उपचार करणे हे जरुरीचे असते परंतु तो निर्माणच होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करणे हे अधिक महत्वाचे ठरते.याच दृष्टीने रसायन चिकित्सा अधिक महत्वाची ठरते.

फायदे -

👉 रसायनामुळे  प्रशस्त सप्तधातूची  निर्मिती होते व त्यामुळे साहजिकच वयःस्थापन घडून येते.

👉 रसायनामुळे बुद्धिवर्धन , बलवर्धन आणि रोग नाशन यांचे सामर्थ्य प्राप्त होते.

👉 व्याधीक्षमत्व हे शारीरिक बल आणि मनोबल यावर आवलंबून असते तर येथे रसायनामुळे शरीरधातूंची सुयोग्य निर्मिती  आणि बलवर्धन होत असल्यानेच शरीरातील व्याधीक्षमत्व आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोग नाशन घडते म्हणजेच याद्वारे रोग निर्माण होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करता येतो.

च्यवनप्राश  का खावे ?

➤ च्यवनप्राश हे चरकांनी रसायन म्हणून सांगितले आहे आणि त्यात पिंपळी ,आवळा यासारखे प्राणवह स्रोतसावर कार्य करणारे रसायन द्रव्य आहेत.

➤ यातील आवळा हे व्हिटॅमिन c चा एक मुख्य स्रोत आहे आणि व्हिटॅमिन c हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदतच करत असते.तर पिंपळी तिच्या उष्ण वीर्याने कफाचे शमन करून कास आणि श्वास सारख्या अनेक संसर्गापासून दूर ठेवते.

➤ तसेच च्यवनप्राशची फलश्रुती वर्णन करताना त्यात प्रथम कास आणि श्वास यांचा नाशनासाठी याचा वापर करावे असे सांगितले आहे.

➤ कोरोना रुग्णांमध्ये कास म्हणजेच खोकला आणि श्वास म्हणजेच Breathlessness आढळून येतो जे कि आयुर्वेदानुसार प्राणवह स्रोतसाचे आजार आहेत  आणि तर च्यवनप्राश च्या वापराने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि त्यामुळेच अश्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. आणि ज्यांना आधीच संसर्ग झाला आहे त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढून हि लक्षणे लवकर कमी होण्यास मदत होते. 

4 comments:

  1. उपयुक्त माहिती
    बाजारात अनेक कंपनीचे चवन प्राश मिळतात.
    सर्वसाधारण कोणत्या प्रकारचे प्राश चांगले असते.

    ReplyDelete

Healing the Womb Naturally: Uttarbasti for Infertility !

            Infertility is an increasingly common concern, affecting millions of women around the world. While modern medical treatments lik...