एवढा ताप आलाय आणि डॉक्टर कोमट पाणी प्यायला सांगताय ? असे कसे ?
ताप असताना अजून कोमट पाणी कशाला ?
कोरोना रुग्णांमध्ये मध्ये कोमट पाणी प्यायला डॉक्टर सांगतात तसेच कोरोनापासून बचावासाठी पण..? असे प्रश्न तर तुम्हाला पण पडत असतील .तर असे का ?
तर कोरोना हा आयुर्वेदानुसार वात -कफज ज्वर आहे. आणि आयुर्वेदानुसार पित्तज ज्वर वगळता इतर ज्वरामध्ये उष्णोदक ( कोमट पाणी) द्यावे असे आचार्य चरक यांनी वर्णन केले आहे.
👉 उष्णोदक म्हणजे काय ?
उष्ण = गरम
उदक = पाणी
उष्णोदक म्हणजे गरम पाणी.
👉पिण्यासाठी उष्णोदक कसे बनवावे ?
पिण्यासाठी उष्णोदक ( कोमट पाणी ) बनवत असताना ते पाणी तापायला ठेवल्यानंतर त्या भांड्यावर न झाकता गरम होऊ द्यावे आणि नंतर ते आपोआप कोमट होऊ द्यावे व असे कोमट पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
ते पाणी फ्रिज मध्ये ठवून गार करू नये.
👉 उष्णोदक सेवनाचे फायदे -
१. ज्वराची उत्पत्ती आमाशयातून होते.आणि आमाशयोत्थ व्याधींमध्ये पचन देणे अपेक्षित असते म्हणूनच - उष्णोदक वापरले असता पाचन कर्म घडून येते.
२. उष्णोदकामुळे वाताचेही अनुलोमन होते.
३. उदरस्थित अग्नी प्रदीप्त होतो.
४.आहार सुखाने पचतो.
५. कफ कमी होतो.
६. थोड्या प्रमाणात उष्णोदक देऊनही तृष्णा ( तहान) शमन होते.
very nicely described n useful information 👍
ReplyDeleteआरोग्यदायी माहिती👌👌
ReplyDelete🙏🙏
DeleteNice
ReplyDelete