दिवाळी म्हंटले कि अभ्यंगस्नान आलेच ..
तर यामागे नक्की कोणता शास्त्रोक्त आधार आहे का ? आणि अभ्यंग का करावा ?आणि कोणी करू नये असे काही आहे का ? असे बरेच प्रश्न कधी कधी वैचारिकांच्या मनात येऊन जातात ..कोणाला त्याची उत्तर भेटतात तर कोणी विचार तसेच सोडून देतो..
अभ्यंग हा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला दिनचर्येचा एक भाग आहे. याचा उल्लेख आचार्य वाग्भटांनी दिनचर्या वर्णन करताना केला आहे.
अभ्यंगम आचरेत नित्यं स जरा श्रम वातहा |
दृष्टी प्रसाद पुष्ट्यायुस्वप्नसुक्त्व दार्ढ्यकृत || (अ.ह्र.सु.२)
दररोज शरीराला तेल लावून अभ्यंग करावा. त्यामुळे जरा ( वार्धक्य ), श्रम , वात यांचा नाश करतो. दृष्टी शुद्ध करते, पुष्टी देतो, आयुष्य वाढवितो , निद्रा देतो , त्वचा सुकुमार करितो व शरीर दृढ करतो.
🎇 अभ्यंग कोणी करू नये ?
वर्ज्योअभ्यंग कफग्रस्त संशुद्धयाजिर्णीभि: | (अ.ह्र.सु.२)
- ज्यांना कफविकार झाले आहेत.
- ज्यांनी वमन / विरेचन घेतले आहे.
- ज्यांना अजीर्ण झाले आहे.
Useful information
ReplyDelete