आजकाल बहुतांश लोक शरीर स्वास्थ्या बद्दल जागरूक झाले आहेत. त्यामुळे व्यायाम करण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. फार कमी लोकांना व्यायामाचा ग्रंथोक्त आधाराबद्दल माहिती असते.आचार्य वाग्भटांनी दिनचर्या वर्णन करताना व्यायामा बद्दल केलेला हा ग्रंथोक्त आधार ..
✅व्यायामाचे फायदे -
- शरीर हलके होते.
- काम करण्याचे सामर्थ्य येते.
- भूक वाढते.
- वात शमतो.
- शरीर कणखर होते.
❌व्यायाम कोणी करू नये ?
- ज्यांना अजीर्ण झाले आहे.
- ज्यांना वातपित्तात्मक विकार झाले आहेत.
- १६ वर्षयच्या आतील मुलांनी व्यायाम करू नये किंवा मोठ्या / तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करावा.
- म्हाताऱ्या व्यक्तींनी व्यायाम करू नये.
ऋतूनुसार व्यायाम -
स्निग्ध आहार घेणारे आणि बळकट शरीराच्या व्यक्तींनी -
शीतकाळी & वसंत ऋतू मध्ये - स्वतःच्या शक्तीच्या अर्धा व्यायाम करावा.
इतर ऋतू मध्ये अल्प व्यायाम करावा.
व्यायाम झाल्यावर काय करावे ?
- व्यायाम झाल्यानंतर हलक्या हाताने सर्वांगास सुखकर वाटेल असे मसाज करावा.
Useful information 👍
ReplyDelete