तुम्हाला माहितीये का
? तुमचे गर्भात असणारे
बाळ तुमचे बोलणे
ऐकू शकते .जेव्हा
तुम्ही आनंदी असाल
तेव्हा ते पण आनंदी असते
,आणि आई दुखी असेल तर
ते पण दुखी असते. आईचे
हसणे , रडणे , झोपणे
, संवाद साधने अश्या सगळ्याच
गोष्टींना बाळ प्रतिक्रिया
देत असते.
प्रत्येक पालकांना असे
वाटते कि त्याची
होणारी संतती ही
बुद्धिमान , दयावान, चारित्र्यसंपन्न ,धैर्यशील
व्हावी.अश्या बऱ्याच
अपेक्षा पालकांना त्यांच्या
होणाऱ्या बाळाकडून असतात.तर
गर्भसंस्कार हे त्याच
पालकांच्या मदतीसाठी आयुर्वेदाचे एक
वरदानच आहे.
गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय ?
गर्भसंस्कार या शब्दाचा
शब्दशः अर्थ म्हणजे
-
गर्भ म्हणजे स्त्रीच्या
गर्भात वाढणारे बाळ
आणि संस्कार म्हणजे
शिकवणे.
तर गर्भसंस्कार म्हणजे गर्भात वाढणाऱ्या बाळाला गर्भात असतानाच काही गोष्टी शिकवणे.तसेच गर्भसंस्कारांच्या मदतीने आई आणि बाळाचे नाते घट्ट होण्यास गर्भातूनच सुरुवात होते व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते.
गर्भसंस्कार हे आयुर्वेदाचे
एक असे वरदान
आहे ज्याच्या मदतीने
तुम्ही तुमच्या बालकास
गर्भात असताना पासूनच
योग्य ते संस्कार
देण्यास मदत होते.
अनेक शोधनिबंधातून असे निदर्शनास
आले आहे कि बाळाचा मेंदू
हा गर्भावस्थेत अधिक
ग्रहणशील असतो.
त्यामुळेच तुम्ही तुमच्या
बाळासोबत गर्भावस्थेतच विविध प्रकारे
तुमच्या बालकाच्या भावनिक
, सर्जनशील ,सामाजिक ,बौद्धिक क्षमतांचा
विकास करण्यासाठी बालकास
मदत करू शकता.
गर्भसंस्काराद्वारे नक्की काय केले जाते ?
👉गर्भसंस्कारांच्या
मदतीने तुम्ही तुमचे
बलक गर्भात असताना
पासूनच तुम्ही त्याच्याशी
तुमचे नाते घट्ट
करू शकता.
👉गर्भसंस्कारा
मध्ये गर्भवती स्त्रीला
तिच्या व तिच्या
गर्भातील बाळासाठी पोषक असा
आहार महिन्यानुसार दिला
जातो .
👉गर्भवतीचे संपूर्ण गर्भारपण संपेपर्यंत
निरोगी आणि सुखरूप
राहावी यासाठी प्रयत्न
केले जातात.
👉गर्भवती स्त्रीसाठी तिच्या गर्भारपणाच्या
महिन्यानुसार योगा व
ध्यान यांचा सल्ला
दिला जातो व तिला योगा
शिकवला जातो.
👉संपूर्ण गर्भावस्था दरम्यान तिच्या
शरीरानुसार गरज असेल
तर तिच्या दैनंदिन
जीवनशैलीत काही बदल
केले जातात आणि
गर्भावस्थेदरम्यान पाळावयाची जीवनशैली बद्दल
तिला मार्गदर्शन केले
जाते.
👉गर्भावस्थे
दरम्यान संगीत थेरपी
सांगितली जाते.
👉बालकाच्या मेंदू च्या
विकासासाठी विविध उपक्रम
घेतले जातात.
👉गर्भावस्थेत
गर्भात असणाऱ्या बालकाशी
कसा संवाद साधायचा
हे शिकवले जाते.यालाच गर्भसंवाद
असे म्हणतात.
👉गर्भसंसकाराद्वारे
तुमच्या बालकाचे चांगले
व्यक्तिमत्व घडवून आणण्यास
योग्य मार्गदर्शन केले
जाते.
👉गर्भसंस्काराद्वारे
संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान गर्भवतीचे
सकारात्मक विचार , सकारात्मक दृष्टिकोन
व बालकाचा शारीरिक
व मानसिक विकास
होण्यासाठी काही उपक्रम
राबवले जातात.
👉होणाऱ्या आईची प्रसूती
साठी मानसिक व
शारीरिक तयारी करू
घेतली जाते.
गर्भसंस्कारांची सुरुवात कधी करावी ?
👉 जर तुम्ही संतती साठी प्रयत्न करणार असाल तर त्यापूर्वी तीन महिने आधीपासून गर्भसंस्कार करावेत.यात बीजसंस्कार , गर्भधारणेपूर्वी पंचकर्म चिकित्सा , गर्भधारणेपूर्वी योगा मार्गदर्शन ,होणाऱ्या पालकांची मानसिक तयारी व इतर काही उपक्रम अश्या प्रकारे गर्भसंस्कार करतात.
आजकाल लोक
गर्भ राहिला हे
माहिती झाले कि गर्भसंस्कार करण्यास येतात. परंतु
जर तुम्ही गर्भवती
होण्याआधीपासून गर्भसंस्कारांची सुरुवात केली तर त्याचे अजून
अधिक फायदे तुम्हाला
मिळू शकतात.
गर्भसंस्कार उपक्रमांना ऑनलाईन
सामील होण्यासाठी / गर्भसंस्कारा
बद्दल अधिक माहिती
व मार्गदर्शनासाठी संपर्क
-
Whatsapp – 7769938803
Email id - hercare2021@gmail.com
डॉ.मयुरी पटवारी
एम.एस.( स्त्रीरोग
& प्रसूतीतज्ज्ञ )
गर्भसंस्कार
, प्रसूती पूर्व - पश्चात योगा
मार्गदर्शक.